प्रतिनिधी /बेळगाव
पियाजिओ वाहनांचे बेळगाव व बागलकोट जिल्हय़ाचे अधिकृत विक्रेते हायटेक मोटर्स व ऑटोमोबाईल्स प्रा. लि. हे असून त्यांनी अलिकडेच अपाची एचटी रेंज सुरू केली आहे. इटालियन पियाजिओ ग्रुपची 100 टक्के साहाय्यक आणि छोटय़ा व्यावसायिक वाहनांची (कमर्शिअल व्हेईकल्स) निर्मिती करणारी पियाजिओ व्हेईकल्स प्रा. लि. ही कंपनी असून त्यांनी पेट्रोल व सीएनजी फ्युएलवर चालणाऱया 300 सीसी वाहनांचा नुकताच बेळगावात प्रारंभ केला. प्रवासी आणि मालवाहतूक करण्यासाठी असलेल्या या अत्याधुनिक वाहनांचे लाँचिंग बेळगावचे साहाय्यक पोलीस आयुक्त नारायण बरमणी यांनी केले.
या लाँचिंग कार्यक्रमप्रसंगी शहापूरचे सीपीआय राजेंद्र कुलकर्णी, हायटेक मोटर्स उद्योग समुहाचे संचालक राजेंद्र देसाई, विनयकुमार बाळेकाई, राजेश भोसगी, बसवराज तंगडी यांच्यासह विक्री व्यवस्थापक अरुण गलगली, सेवा व्यवस्थापक एच. टी. हिरेमठ, पियाजिओ कंपनीचे विक्री व्यवस्थापक बसवराज गड्डी आणि पहिले ग्राहक हुवाप्पा कल्लूर आदी उपस्थित होते.
अपाची एचटी वाहनाबाबत…
हे नवीन वाहन अधिकाधिक लोड क्षमता देण्यासाठी उच्च शक्ती व टॉर्कसह बनविले असून त्याच्या एफआय स्मार्ट इंजिनमुळे कमी आवाज व कंपणे निर्माण होतात. कार्गो श्रेणी 5 फूट, 5.5 फूट व फुटी डेक लांबी पर्यायासह उपलब्ध आहे. अपाची वाहन पेट्रोल श्रेणीत कार्गोमध्ये 5 वर्षे किंवा दीड लाख कि.मी.वर सीएनजी पॅसेंजर व मालवाहू प्रकारात 3 वर्षे किंवा एक लाख कि.मी.ची हमी (वॉरंटी) देते. 300 सीसी क्षमतेचे इंजीन पियाजिओ इटलीच्या सहकार्याने भारतात विकसित केले आहे, अशी माहिती गड्डी यांनी दिली.









