प्रतिनिधी / कणकवली:
मूळ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील श्रीमती लीलाताई पंढरीनाथ तावडे (वय 86) यांचे रविवारी मुंबई – मुलुंड येथे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, तीन मुली, दोन सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सुरेंद्र तावडे, कणकवलीतील डॉ. विजय तावडे व मुंबई एलआयसी मधील प्रकाश तावडे यांच्या त्या मातोश्री तर निवृत्त जिल्हा सत्र न्यायाधीश कै. पंढरीनाथ तावडे यांच्या त्या पत्नी होत.









