ऑनलाईन टीम / इस्लामाबाद :
लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या हाफिज सईद याच्या लाहोरमधील घराबाहेर झालेल्या स्फोटाप्रकरणी पीटर पॉल डेव्हिड या परदेशी नागरिकाला अटक करण्यात आली आहे.
हाफीजच्या लाहोरमधील जोहर टाऊन येथील घराबाहेर तीन दिवसांपूर्वी स्फोट झाला होता. या स्फोटात 3 जण ठार झाले होते. तर 21 जण जखमी झाले होते. पाकिस्तानच्या पंजाब प्रांताचे मुख्यमंत्री उस्मान बाजदार यांनी पोलिसांना या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश दिले होते. तपासाअंती पीटर कराचीला जात असताना त्याला विमानातून खाली उतरवून अज्ञात ठिकाणी नेण्यात आल्याचे तसेच स्फोटात वापरलेली मोटार त्याची असल्याचे तपासात समोर आले आहे.
पीटर हा कराची, लाहोर आणि दुबई असा सातत्याने प्रवास करीत असल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रवासाबद्दल त्याने माहिती दिली नाही. स्फोटात वापरलेली त्याची मोटार कोण चालवत होते, याचा पोलीस शोध घेत आहेत.









