प्रतिनिधी/ रत्नागिरी
मुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा येथे ट्रक-ओमनी कारमध्ये झालेल्या धडकेत ओमनी चालक जखमी झाल़ा ही घटना रविवारी सायंकाळी 5 च्या सुमारास घडल़ी प्रवीण मधुकर सावंत (56, ऱा वळके पाली) असे अपघातातील जखमीचे नाव आह़े निष्काळजीपणे वाहन चालवल्याप्रकरणी सावंत यांच्यावर ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आह़े
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सावंत हे रविवारी सायंकाळी ओमनी कार (एमएच 08 एजे 7803) घेवून हातखंबा येथून जात होत़े यावेळी आसरा देवीच्या मंदिरापासून निवळीकडे जणाऱया रस्त्यावर समोरून येणारा ट्रक (एमएच 04 सीपी 7654) याला सावंत यांच्या ताब्यातील ओमनी कारने जोरदार धडक दिल़ी या अपघातात सावंत याना दुखापत झाली असून उपचारासाठी त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आह़े









