हातकणंगले / प्रतिनिधी
लॉक डाऊनच्या काळांतही शासकीय नियम पायदळी तुडवत सुरू असलेल्या हातकणंगले येथील मयूर परमिट रूम बिअर बार वर मंगळवारी रात्री हातकणंगले पोलिसांनी छापा टाकला. यावेळी सुमारे ३५ हजाराची दारू जप्त केली असून या प्रकरणी बारमालक मयुर राजाराम कोळी ( वय ३० ) व व्यवस्थापक दयानंद बंडू भराडे ( वय ३६ )रा.हातकणंगले व विनय चंद्रकांत सातपुते (वय३० ) रा. इचलकरंजी यांना पोलिसांनी ताब्यांत घेतले आहे. याबाबतचा गुन्हा हातकणंगते पोलिसांत दाखल झाला आहे.
अधिक माहिती अशी, हातकणंगले येथील लक्ष्मी औद्यो. रस्त्यांबरील मयूरबारमध्ये शासनाचे नियम डावलून गिहाईकांना दारु दिली जात होती. याची माहिती मिळताच पो.नि.के. एन. पाटील., पो.उप. नि. यशवंत उपराटे, पो.कॉ.पांडूरंग पाटील, पी.जी. लाड, एस.जी. गायकवाड, संग्राम. खराडे, अतुल निकम, आर.आर. धोत्रे, योगेश पारधी यांच्या पथकाने तेथे छापा टाकला. यावेळी ग्राहक पसार झाले. तर मुद्देमालासह पोलिसांनी बारमालक व व्यवस्थापकांना ताब्यात घेतले.









