प्रतिनिधी / हातकणंगले
हातकणंगले नगरपंचायतीला विद्यमान खासदार धैर्यशील माने यांची भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.
हातकणंगले परिसरात वाढत चाललेला कोरोनाचा प्रादुर्भाव यावर प्रशासनाने केलेल्या उपाययोजना याचा आढावा घेण्यासाठी विद्यमान खासदार धैर्यशील माने यांनी आज दुपारी शासकीय विश्रामगृह येथे बैठक घेऊन गावाची परिस्थिती जाणून घेतली व यावर काय उपाययोजना करता येतील याविषयी चर्चा केली, यात प्रामुख्याने हातकणंगले नगरपंचायतीचे मुख्याधिकारी योगेश कदम यांनी नगरपंचायतीचा पायाभूत सुविधा साठी लागणारा निधी तसेच औषध फवारणी साठी ट्रॅक्टरसह औषध फवारणी पंप मिळावा, तसेच आकृतीबंध मंजुरी साहाय्यक अनुदानाची मागणी केली. यावेळी विद्यमान खासदार यांनी आपल्या मागण्या त्वरित मंजूर करण्यासाठी आपण प्रयत्न करेन व त्यात तातडीने आपलाच उपलब्ध करून देईन असे आश्वासन.
यावेळी नगराध्यक्ष अरुणकुमार जानवेकर ,उपनगराध्यक्ष रणजीत धनगर. नगरसेवक विजय खोत, स्वीकृत नगरसेवक धोंडीराम कोरवी रंजीत मोरे , इत्यादी उपस्थित होते.
Previous Articleकर्नाटकः कोविड -१९ च्या निधीच्या गैरव्यवहार प्रकरणी काँग्रेसची न्यायालयीन चौकशीची मागणी
Next Article भेंडवडेत आणखी दोन रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह








