प्रतिनिधी / हातकणंगले
कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुक हातकणंगले तालुक्यातील तासगाव ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली आहे.
जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. यात तब्बल ४३३ ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारीला मतदान होणार आहे तर १८ जानेवारीला मतमोजणी होणार आहे. तसेच ४ जानेवारीला अर्ज मागे घेणे व चिन्हवाटप केले जाईल. ग्रामपंचायतींचा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आला आहे.
याच ग्रामपंचायत रणधुमाळीत जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील तासगाव ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली आहे. याकामी माजी आमदार अमल महाडिकसो, व आमदार विनय कोरेसो यांचे सहकार्य लाभले. ९ जागेपैकी ७ जागा महाडिक गटाचे शिवाजीराव पाटील ( काका )यांच्या गटाला, तर कोरे गटाचे संपतराव पाटील यांच्या गटाला २ जागा . अशी विभागणी करत ग्रामपंचायत निवडणुक बिनविरोध करण्यात आली आहे.









