टोप /वार्ताहर
हातकणंगले तालुक्यातील कासारवाडी येथील मंडलिक चेचरे मळा येथे विजांच्या कडकडासह जोरदार पाऊस झाला. आज सायंकाळी साडेपाचच्या सुमारास या ठिकाणी शेतात विज पडल्याने शेतमजुराचा मृत्यू झाला. भरत संभाजी वाणी (वय ३५) रा निर्मळवाडी ता.वडवणी जि.बीड असे मृताचे नाव आहे. तर त्या ठिकाणी असणारा दोन मुले सुदैवाने बचावली.
कासारवाडी येथील मंडलिक चेचरे मळा शरद मंडलिक यांच्या शेतात भरत वाणी हे पाच वर्षांपासून काम करत आहेत. लिंबाचे झाडा जवळ पाणी पाजत आसताना त्याठिकाणी झाडावर अचानक विज पडली. यामध्ये भरत वाणी जागीच ठार झाले. तर जवळ असणारे अर्जुन वाणी आणि करण वाणी हे दोघे बचावले.
यावेळी पत्नी दुध घालण्यासाठी कासारवाडी येथे गेली होती. अचानक वीज कोसळल्याने भरत यांचा जागीच दुर्देवी मृत्यू झाला. घटणास्थळी त्यांच्या कुटुंबीयांचा आक्रोश हृदय हेलावून टाकणारा होता.
घटनास्थळी एमआयडीसी पोलिस ठाण्याचे कॉन्स्टेबल अनिल पाटील यांनी पंचनामा केला.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









