प्रतिनिधी / हातकणंगले
हातकणंगले तहसीलदार कार्यालयात लिपिक म्हणून कार्यरत असलेला एक वडगाव मधील कर्मचारी दोन दिवसापूर्वी कोरोना लागण झाल्याचे निष्पन्न झाले असून त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र याची कल्पना तहसीलदार कार्यालयात या परिसरात कळतात एक खळबळ उडाली आहे. वरिष्ठांशी संपर्क साधला असता संबंधित कर्मचारी ज्या विभागात कार्यरत होता.
तो संपूर्ण विभाग पूर्णता निर्जंतुकीकरण केले असून नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून शासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून सद्यस्थितीला तहसीलदार कार्यालयातील कामकाज सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र या घटनेची उलट- सुलट चर्चा तहसीलदार कार्यालयाच्या आवारात सुरू आहे. संबंधित कर्मचारी हा नेहमीच जनतेच्या संपर्कात येत होता. त्यामुळे त्याच्या संपर्कात आलेल्या नागरिकांची ओळख पटवून त्यांची ही तपासणी करून घ्यावी अशी मागणी जनतेतून होत आहे.
तर काही दिवसांपासून कोरोनाचे संकट काहीशे कमी झाल्याची आकडेवारी जनतेसमोर येत होती, मात्र अचानक या कार्यालयात एखादा कर्मचारी ककोरोनाची लागण झाल्याचे कळल्याने ही कोणाची दुसरी लाट आहे का यावरही जनतेतून जोरात चर्चा सुरू आहे.









