प्रतिनीधी / हातकणंगले
हातकणंगले तालुक्यातील ६० ग्रामपंचायतींच्या सन २o२o ते २o२५ या कालावधीसाठीचे सरपंच पदाचे आरक्षण सोडत पद्धतीने दिनांक १५ डिसेंबर रोजी येथील नविन प्रशासकीय इमारतीत काढण्यात येणार असल्याची माहिती तहसिलदार प्रदिप उबाळे यांनी दिली. या मध्ये हातकणंगले तालुक्यातील ६० ग्रामपंचायतीचा समावेश असून त्यात अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती , नागरिकांचा मागास प्रवर्ग, सर्वसाधारण, व सर्वसाधारण स्त्रिया इ. प्रवर्गाचा समावेश असणार आहे.
प्रवर्गनिहाय आऱक्षण पुढील प्रमाणे अनुसुचित जाती स . सा – ६ , स्त्रीया – ६, अनु.जमाती -स्त्री -१, नागरीकांचा मागास प्रवर्ग – स. सा -८, स्त्रि – ८, सर्वसाधारण प्रवर्ग -स. सा-१६ , स्त्रि-१५ प्रमाणे आहे.









