शहापूर येथील केएलई आयुर्वेदिक हॉस्पिटलमध्ये आयोजन
प्रतिनिधी /बेळगाव
हाडांची ठिसुळता, बॅक पेन्स, जॉईंट पेन्स, कॅल्शियमची कमतरता याबाबतच्या तपासणी शिबिराचे आयोजन शहापूर येथील केएलई हॉस्पिटलच्यावतीने करण्यात येणार आहे. शनिवार दि. 12 रोजी या मोफत शिबिराचे आयोजन करण्यात आले असून नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. प्रदीप ग्रामपुरोहित यांनी केले आहे. पत्रकार परिषद घेऊन त्यांनी ही माहिती दिली.
आजादी का अमृतमहोत्सवनिमित्त या शिबिराचे आयोजन करण्यात आले असून शनिवारी सकाळी 9 ते दुपारी 1.30 आणि दुपारी 2.30 ते 5 या वेळेत हे शिबिर घेतले जाणार आहे. या शिबिराला राज्याचे आयुष्यचे जॉईंट डायरेक्टर डॉ. बी. एस. श्रीधर उपस्थित राहणार आहेत. या शिबिराचा लाभ घ्यावा, असे कळविण्यात आले आहे. रुग्णांना मोफत उपचार तसेच औषधदेखील दिले जाणार आहे.
बीपीएल कार्डधारकांना सवलत
पंचकर्मासारखे उपचार करून रुग्णांना सेवा दिली जाणार आहे. बीपीएल कार्डधारकांना उपचारासाठी या हॉस्पिटलमध्ये सवलत असल्याचेही त्यांनी सांगितले. तरी या हॉस्पिटलमध्ये येऊन रुग्णांनी उपचार घेतल्यास त्यांचा खर्च वाचेल, असे त्यांनी सांगितले.