ऑनलाईन टीम / बीजिंग :
हाँगकाँगवर पूर्णपणे ताबा मिळवण्यासाठी तयार करण्यात आलेला राष्ट्रीय सुरक्षा कायदा चिनी संसदेमध्ये आज मंजूर झाला. त्यामुळे आता हाँगकाँग पूर्णपणे चीनच्या नियंत्रणात येणार आहे. एका वृत्तसंस्थेने याबाबतचे वृत्त दिले आहे.
हाँगकाँग हे जगातील महत्वाचे वित्तीय केंद्र आहे. 1997 मध्ये ब्रिटिशांची वसाहत असलेले हाँगकाँग चीनकडे सोपवण्यात आले. तेव्हापासून हाँगकाँग चीनच्या नियंत्रणात आहे. चीनच्या नियंत्रणात असले तरी हाँगकाँगचे कायदे वेगळे आहेत. त्यामुळे चीनला तेथील कारभारात हस्तक्षेप करता येत नव्हता.
हाँगकाँगमधील जनता आपल्या हक्कांसाठी जागरूक असल्याने हाँगकाँगमध्ये चीनचे सर्व कायदे लागू होत नाहीत. हाँगकाँगमध्ये चीनच्या तुलनेत अनेक सवलती आहेत. मात्र, आता हाँगकाँग पूर्णपणे चीनच्या अधिकारात येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.









