ऑनलाईन टीम / विक्टोरिया :
हाँगकाँगमधील ‘ॲपल डेली’ या लोकप्रिय टॅबलॉईडचे मालक आणि ‘नेक्स्ट मिडीया’ या माध्यम समुहाशी संबधित जिमी लाई यांच्यासह सात जणांना अटक करण्यात आली आहे. राष्ट्रीय सुरक्षा कायद्याचे उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली या सर्वांना अटक करण्यात आल्याचे हाँगकाँग पोलिसांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.
जिमी लाई त्यांच्या मीडियाच्या माध्यमातून लोकशाहीवादी आवाज उठवत होते. विदेशी शक्तींबरोबर संगनमत केल्याच्या संशयावरून लाई यांच्याविरोधात कारवाई करण्यात आली आहे. लाई यांच्या प्रसिद्धी माध्यम क्षेत्रातील संस्थेवर चीनने निर्बंध घातले आहेत. तसेच त्यांच्या प्रसिद्धी माध्यम संस्थेच्या मुख्यालयावरही चीनने छापा टाकला आहे.
लाई यांच्या टॅबलॉइडमधून चीनच्या एकधिकारशाही विरोधात नियमित टीका केली जात असते. त्यामुळे लाई यांच्या मुलासह अन्य संबंधित्यांच्या घराचीही पोलिसांनी झडती घेतली आहे.









