हाँगकाँग : हाँगकाँगमध्ये कोरोना महामारीने पुन्हा एकदा थैमान घालायला सुरूवात केली असून या दरम्यान पाच हजार जणांनी आपला प्राण गमावला असल्याची माहिती आहे. कोरोना रुग्णांची संख्या दहा लाखांवर पोहोचली असल्याचेही सरकारकडून सांगण्यात येत आहे. वाढलेल्या रुग्णांच्या संख्येनंतर हाँगकाँग सरकारने खबरदारीचे आदेश दिले आहेत. शुक्रवारी एका दिवशी 20 हजार कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. डिसेंबरमध्ये सुरू झालेली ही लाट हाँगकाँगमध्ये अधिक वेगाने पसरत असून वाढती रुग्णसंख्याही सरकारसाठी चिंता वाढवणारी ठरते आहे. परिणामी पुन्हा एकदा देशातील आरोग्य व्यवस्था कामाला लागली असल्याचे दिसले आहे. सरकारने आरोग्य खात्याच्या मदतीने आवश्यक ते उपाय करण्याला प्राधान्य दिले आहे. कोरोनासाठी आवश्यक ते प्रतिबंधही लावले जात असल्याचे सांगितले जाते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









