प्रतिनिधी / कोल्हापूर
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणजे सत्ताधारी महाविकास आघाडीतील विरोधीपक्ष नेते आहेत. त्यांना अधून- मधून बोलल्याशिवाय करमत नाही. असा उपरोधात्मक टोला विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी लगावला.
दरेकेर हे गुरुवारी ते कोल्हापूर दौऱयावर आले असता प्रसार माध्यमांशी बोलतानाही त्यांनी मुश्रीफ यांच्यावर टिका केली. ते म्हणाले, राजकारणात सरकारवर अंकुश ठेवण्याचे काम विरोध पक्षाचे आहे. पण सत्ताधारी महाविकास आघाडीतील मंत्री नेत्यांना सत्ताधारी, विरोधकांतील फरक समजेना झालाय. मुश्रीफ यांच्या वारंवारच्या वक्तव्यातून हेच समोर येत आहे. हे सरकार लवकरच पडणार असे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. यावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री किंवा महाविकास आघाडीतील नेत्यांनी बोलले पाहिजे पण फडणवीस, मोदी, राज्यपाल यांच्याबाबात मुश्रीफच बोलत असता. त्यांची वक्तव्य दखलपात्र नाहीत. त्यामुळे आमच्यातील कोणीही मुश्रीफ यांना गांभिर्याने घेत नाही.
महालिका भाजपच्या झेंडÎाखाली
कोल्हापूर महापालिका भाजप लढवणार आहे. यात शंका कसली घेताय असा सवाल करीत दरेकर यांनी भाजपची निवडणूक डोळयासमोर ठेवून कधीच तयारी नसते. वर्षभर जनतेश संवाद सुरु असतो. त्यामुळे दोन खासदार असणारा पक्ष पूर्ण बहुमतात केंद्रातील सत्ता सांभाळत आहे. महापालिका ताकदीने लढवून भाजपचा झेंडा फडवणार यात शंका नाही.
शाळांन टप्प्याटप्प्प्याने अनुदान द्या
गेली वीस पंचवीस वर्षापासून विना अनुदानीत शाळांचा प्रश्न प्रलंबित आहे. शिक्षकांना पगार नाहीत. त्यांना रस्त्यावर येण्याची वेळ आली आहे. न्याय मिळत नाही म्हणून शिक्षका उपोषणाला बसले आहेत. त्यांच्याबाबत सरकारने संवेदनशील झाले पाहिजे अशी मागणी दरेकर यांनी केली. कोरोनाचे संकट आहे. म्हणून त्यांच्याकडे दर्लक्ष करणे अजिबात बरोबर नाही. सरकारला हे शोभत नाही. त्यांच्या पगारासाठी टप्प्याटप्प्याने अनुदान दिले पाहिजे.









