वृत्तसंस्था / नवी दिल्ली
हवामान बदलावर देखरेख ठेवण्यासाठी भारत सर्वात मोठे पाऊल टाकणार आहे. जगातील सर्वात मोठा अर्थ ऑब्जर्व्हेशन उपग्रह ‘निसार’ जानेवारी 2023 मदये श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्राtत प्रक्षेपित होणार आहे. निसार हा अमेरिकेची अंतराळ संस्था नासा आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचा (इस्रो) संयुक्त प्रकल्प आहे. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 747 किलोमीटर उंचीवरील कक्षेतून निसार दर आठवडय़ाला पूर्ण पृथ्वीचे एक नवे छायाचित्र प्रदान करणार आहे.
दर 12 दिवसांनी हा समान कक्षेत प्रवास करणार आहे. या उपग्रहाकडून मिळणाऱया डाटाचा वापर हवामान बदल आणि पृथ्वीवरील नैसर्गिक घटनांना समजून घेण्यास आणि आपत्ती व्यवस्थापनाकरता केला जाणार आहे. हा उपग्रह पृथ्वीवरील हरित क्षेत्र, बायोमास, मातीमधील ओलावा, वेटलँड आणि मॅन्ग्रोव्ह असेसमेंट, किनाऱयांमधीरल बदल, सरफेस डिफॉर्मेशन, फॉरेस्ट डिस्टर्बन्सवर नजर ठेवणार आहे. याचा डाटा एक ते दोन दिवसात तर आपत्कालीन स्थितींमध्ये दोन तासात उपलब्ध होईल. या मोहिमेवर इस्रो 778 कोटी रुपये तर नासा सुमारे 6 हजार कोटी रुपये खर्च करत आहे.
एल बँड रडार पृथ्वीवरील भूमी, समुद्र आणि बर्फाच्या ऑल व्हेदर आणि दिवसरात्रीची छायाचित्रे उपलब्ध करणार आहे. तर एस बड रडार विशेषकरून भारत आणि धूवीय भागाची छायाचित्रे पुरविणार आहे. एल बँड रडारसोबत रडार रिफ्लेक्टर अँटेना, नासा डाटा जीपीएस रिसिव्हर आणि सॉलिड स्टेट रिकॉर्डरही उपलब्ध करणार आहे.
निसार म्हणजेच नासा-इस्रो सिंथेटिक अपर्चर रडारमध्ये एल बँड आणि एस बँड हे दोन रडार असतील. करारानुसार एल-बँड रडार नासाने तर एस-बँड रडार इस्रोने तयार करणे अपेक्षित होते. इस्रोच्या स्पेस ऍप्लिकेशन सेंटरने एस-बॅड रडार तयार करून नासाच्या जेट प्रोपल्शन लेबोरेट्रीत पाठ्रवला आहे. हा रडार एल-बँड रडारसोबत इंटीग्रेड करण्यात येत आहे.









