प्रतिनिधी/ रत्नागिरी
जागतिक बॅंक आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या जल विज्ञान हवामान कृती योजनेत देशातील 6 शहरांची निवड करण्यात आली आह़े या सहा शहरामध्ये रत्नागिरीचीही निवड करण्यात आली आह़े
बदलत्या हवामानाचा सामना करण्यासाठी ही शहरे सक्षम ठरणार आहेत का, याचा सर्वकष अभ्यास करण्यात येणार आहे. त्यानुसार रत्नागिरी शहरामध्ये आवश्यक अशा उपाययोजना करण्यात येणार आहेत़ या अभ्यासासाठी 18 महिन्यांचा कालावधी ठरवण्यात आला आह़े त्यानंतर या बद्दलचा सविस्तर अहवाल तयार करुन जागतिक बँकेसमोर सादर करण्यात येणार आह़े रत्नागिरी किनारपट्टीला वादळांचा, चक्रीवादळांचा फटका गेले काही वर्ष बसत आह़े मात्र त्यानुसार शहरामध्ये हवामान केंद्र सक्षम करण्यासाठी कोणत्याही उपाययोजना गेल्या काही वर्षामध्ये करण्यात आलेल्या नाहीत़ होणाऱया नुकसान टाळण्याची केंद्र सरकारने पावले उचलण्यास सुरुवात केली आहेत़ त्यानुसार राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्पांतर्गत जिह्यातील हर्णै, दाभोळ येथे निवारा शेड उभारण्याचे काम सुरु आह़े तसेच या प्रकल्पार्तगत शहरासह 6 ग्रामपंचायतीमध्ये चक्रीवादळापासून नुकसान कमी होण्यासाठी भुयारी वीजवाहिन्यांची कामेही सुरु झाली आहेत़
महाराष्ट्रामधील रत्नागिरीसह, गोव्याचे पणजी, कर्नाटकचे मंगळुर, केरळचे कोची, गुजरातचे पोरबंदर आणि पश्चिम बंगालमधील बिदा नगर या शहरांचा अभ्यास होणार आह़े या निवडलेल्या शहरांवर भविष्यामधील वाढती चक्रीवादळे, वाढते तापमान, बदलते हवामान यांचा शहर वाढ व विकासावर कोणता बदल होत आहे, यामधून शहराला कोणकोणते धोके उत्पन्न होत आहेत, त्यातून विकासाच्या नव्या संधी कोणत्या आहेत, अशी नैसर्गिक संकटे आल्यावर रहिवाशांना कोणता धोका पोहोचणार आहे, शहराची क्षमता किती आहे, येथे कोणत्या मुलभूत सेवा आहेत, येथील समाजरचना आदी बाबींचा सखोल अभ्यास या प्रकल्पाच्या माध्यमातून केला जाणार आह़े या बाबींचा अभ्यास करुन 18 महिन्यांमध्ये अहवाल सादर करण्याची कालमर्यादा निश्चित करण्यात आली आह़े शहरे अधिकाधिक सक्षम करण्यासाठी व विकास करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजनांचा योजल्या पाहिजेत. यावर तज्ञ अभ्यास करणार असून हा अहवाल जागतिक बँकेला सादर करण्यात येणार आह़े
शहराच्या अभ्यासात गटारे, सांडपाणी व्यवस्थापन, पिण्याचे पाण्याचे नियोजन, रस्ते, वीज, भूमिगत वीजपुरवठा यासाठी शहराची जबाबदारी घेणाऱया नगर परिषदेच्या अर्थसंकल्पात होणारी तरतूद, वाढत्या तापमानामुळे होणारी समुद्राची पातळी आदींचा अभ्यास होणार आह़े यासाठी नवी दिल्ली येथील रॉयल हसकाँनिग या संस्थेला काम देण्यात आले आह़े हवामान अभ्यासासंदर्भात पहिल्या बैठकीला हायड्रोलॉजिस्ट सुजाना धर, शहर समन्वयक हर्षद धांडे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अजय सूर्यवंशी, नगर परिषदेचे अधिकारी व इतर विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होत़े









