नवी दिल्ली
तिकीट दरात कोणतीही वाढ केली जाणार नसल्याने विमान प्रवास करू इच्छिणाऱया प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. नागरि हवाई उड्डाण मंत्रालयाने याबाबतचा खुलासा करताना 24 नोव्हेंबरपर्यंत विमान तिकीट दरात कोणतीही वाढ करता येणार नसल्याचे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. विमाने सुरू करण्याच्या मागणीनंतर देशांतर्गत विमानसेवा 25 मेनंतर सुरू करण्यात आली आहे. विमानसेवा सुरू केलेली असली तरी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व ती खबरदारी कंपन्यांकडून घेतली जात असल्याचे सांगण्यात येते.