नवी दिल्ली
हवाई इंधनाच्या दरामध्ये नुकतीच 2 टक्के इतकी वाढ झाली आहे. असं जरी असलं तरी प्रवासभाडे वाढवण्याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक विमाने रद्द करण्यात आली होती. आता हळुहळू विमानांची संख्या वाढवली जात आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील विमान इंधनाचे दर नुकतेच वाढवले आहेत. बाजारातील परिस्थितीवरून याबाबतचा निर्णय घेतला गेला आहे. राष्ट्रीय राजधानी विभागात हे इंधन आता प्रति किलो लिटरमागे सुमारे 700 रुपयांनी वाढलंय. आता तेथील इंधनाचा दर प्रति किलो लिटर 40 हजार 211 रुपयांवर पोहोचला आहे.









