278 प्रवाशांपैकी 36 जण जखमी ः फिनिक्सहून होनोलुलूला जात होते विमान
@ पॅरिस / वृत्तसंस्था
अमेरिकेतील हवाई येथे सोमवारी एका प्रवासी विमानात गोंधळाची स्थिती (एअर टर्बुलन्स) निर्माण झाली. फिनिक्सहून होनोलुलुला जाणाऱया हवाईयन एअरलाइन्सच्या एचए-35 फ्लाइटमध्ये ही घटना घडली. टेक ऑफ केल्यानंतर अवघ्या 30 मिनिटांतच विमान अशांततेचे बळी ठरले. या घटनेत 278 प्रवाशांपैकी 36 जण जखमी झाले. तर 11 प्रवाशांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींमध्ये एका 14 महिन्यांच्या मुलाचाही समावेश आहे. हवाईयन एअरलाईन्सने एक निवेदन जारी केले असून त्यात 13 प्रवाशांसह 3 क्रू मेंबर्सना तातडीने रुग्णालयात दाखल केल्याचे स्पष्ट केले आहे.
विमान लँडिंगपासून 30 मिनिटांच्या अंतरावर असताना गोंधळ झाला. प्रवाशांनी सीटबेल्टचा वापर न केल्यामुळे ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे. सोमवारी सकाळी 10ः50 वाजता विमानाने होनोलुलू येथे सुरक्षित लँडिंग केले. विमान उतरण्याच्या काही वेळापूर्वी अग्निशमन, पॅरामेडिक्स आणि राज्य विमान बचाव अग्निशमन दलाला सज्ज ठेवण्यात आले होते.









