ऑनलाईन टीम/वॉशिंग्टन
इराण आणि अमेरिकेत सध्या युध्दजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. अमेरिकेने केलेल्या हवाई हल्ल्याला प्रतिउत्तर देत इराणने आज इराकमधील अमेरिकी लष्कराच्या तळावर क्षेपणास्त्र हल्ला चढवला. या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज अमेरिकेन जनतेशी संवाद साधला. यावेळी ट्रम्प यांनी आपले सैनिक सुरक्षित असल्याचे सांगितले. इतकेच नाही तर इराणने जर का हल्ले थांबवले नाही तर आर्थिक निर्बध आणणार असल्याचा इशारा देखील ट्रम्प यांनी यावेळी दिला.
यावेळी बोलताना ट्रम्प म्हणाले, अमेरिका इराणवर आर्थिक निर्बध घालणार असून त्यांना अण्वस्त्र तयार करू देणार नसल्याचे ट्रम्प यांनी यावेळी सांगितले. इतकेच नाही तर कासीम सुलेमानी पासून अमेरिकन नागरिकांना धोका होता म्हणूनच सुलेमानीला ठार मारले असल्याचे ते म्हणाले. सुलेमान अमेरिकेतील काही ठिकाणांवर हल्ला करणाच्या तयारीत होता. मात्र यापूर्वीच अमेरिकेने सुलेमानीला ठार मारले. अमेरिकेकडे अत्याधुनिक क्षेपणास्त्रे आहेत मात्र, आमच्या देशाला शांतता हवी असल्याचे ट्रम्प म्हणाले. युरोपीयन देशांनी इराणविरोधात एकत्र यायला हवे असे आवाहन देखील ट्रम्प यांनी यावेळी केले.









