चालक जखमी, सुदैवाने जीवितहानी नाही
प्रतिनिधी/ बेळगाव
भरधाव कँटरची ऊसवाहू ट्रक्टरला धडक बसून पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गाजवळील हलग्याजवळ शनिवारी मध्यरात्रीनंतर अपघात झाला. या अपघातात सुदैवाने जीवितहानी झाली नाही.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कँटरचालक केबिनमध्ये अडकला होता. त्याला बाहेर काढून उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्याला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहेत. यासंबंधी रविवारी रात्री हिरेबागेवाडी पोलीस स्थानकाशी संपर्क साधला असता या घटनेची नोंद झाली नसल्याचे अधिकाऱयांनी सांगितले.









