प्रतिनिधी/ बेळगाव
हलगा येथे नुकताच एक विचित्र जीव निदर्शनास आला आहे. या किडय़ाला ना तोंड ना पाय अनेक जीव एकत्र येऊन हा किडा तयार झाला असावा, असे प्रथमदर्शनी दिसते. परंतु हा नेमका किडा आहे की अळी याची चर्चा परिसरात रंगली आहे. त्यामुळे जीवाविषयीचे कुतूहल वाढले आहे.
हलगा येथील विलास व संजू परीट हे मॉर्निंग वॉकसाठी तारिहाळ रोडवर गेले होते. त्यावेळी त्यांना हा जीव दृष्टीस पडला. अनोखा जीव दिसल्याने त्याचा फोटो व व्हिडिओ काढला. या विषयीची माहिती घेतली असता त्याला शास्त्राrय नाव मिळाले नसले तरी हा जीव नेमका कोणता होता, हा प्रश्न उपस्थित होत आहे.









