पुन्हा व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून सुनावणी
प्रतिनिधी/ बेळगाव
हलगा-मच्छे बायपास रस्ता पूर्ण करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि जिल्हा प्रशासन प्रयत्न करत आहेत. या रस्त्याविरोधात शेतकऱयांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्या ठिकाणी न्यायालयाने शेतकऱयांची बाजु उचलून धरत या रस्त्याला स्थगिती दिली आहे. तरीदेखील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण ती स्थगिती उठविण्याचा प्रयत्न करत आहे. मंगळवारी शेतकऱयांच्या बाजुने ऍड. रविकुमार गोकाककर यांनी पुन्हा एकदा खंबीरपणे बाजु मांडली. त्यामुळे न्यायालयाने स्थगिती कायम ठेवली आहे.
अत्यंत सुपीक जमीनीतून हा रस्ता करण्याचा घाट घालण्यात आला. शेतकऱयांच्या जमिनी हिसकावून घेण्यात आल्या. तरीदेखील शेतकऱयांनी त्या विरोधात उच्च न्यायालयात धाव घेऊन स्थगिती मिळविली. ऍड. रविकुमार गोकाककर यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून शेतकऱयांची बाजु न्यायालयासमोर मांडली आहे. आता पुन्हा स्थगिती कायम केल्याने शेतकऱयांतून समाधान व्यक्त होत आहे. पुढील सुनावणी ऑगस्ट महिन्यात होण्याची शक्मयता आहे..









