स्थगिती कायम, सुनावणीकडे शेतकऱयांचे लक्ष
प्रतिनिधी /बेळगाव
हलगा-मच्छे बायपास खटल्याची सुनावणी शुक्रवारी होती. मात्र ही सुनावणी पुन्हा पुढे ढकलली असून 6 डिसेंबर रोजी सुनावणी होणार आहे. त्यामुळे आता शेतकऱयांचे लक्ष त्याकडे लागले आहे. या रस्त्याच्या कामाला मात्र स्थगिती कायम ठेवली आहे.
हलगा-मच्छे बायपास रस्ता अत्यंत सुपीक जमिनीतून होत आहे. शेतकऱयांनी या रस्त्याला तीव्र विरोध केला आहे. असे असताना दडपशाही करत शेतकऱयांच्या पिकांमध्ये जेसीबी चालवून रस्त्याच्या कामाला सुरूवात करण्यात आली. मात्र त्यानंतर शेतकऱयांनी न्यायालयात धाव घेतली आहे.
आठवे अतिरिक्त दिवाणी न्यायालयाने ही सुनावणी पुन्हा पुढे ढकलली आहे. शेतकरी मोनाप्पा बाळेकुंद्री यांनी याचिका दाखल केली आहे. त्यामुळे स्थगिती कायम ठेवण्यात आली आहे.









