@ प्रतिनिधीबेळगाव
बेळगाव पोलिसांनी मटका अड्डय़ांवर कारवाईचा सपाटा सुरूच ठेवला आहे. शुक्रवारी रात्री हलगा व कलईगार गल्ली परिसरातील अड्डय़ांवर छापे टाकून चौघा जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या जवळून 7 हजार 950 रुपये रोख रक्कम व मटक्मयाचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.
पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे यांनी ही माहिती दिली. हिरेबागेवाडीचे पोलीस निरीक्षक विजयकुमार शिन्नूर व त्यांच्या सहकाऱयांनी हलगा येथे लक्ष्मण फकिराप्पा बजंत्री (वय 65, रा. हलगा) याला अटक करून त्याच्या जवळून 3 हजार 250 रुपये रोख रक्कम जप्त केली आहे. जोतिबा चौगुला या बुकीवरही एफआयआर दाखल करण्यात आला असून तो फरारी आहे.
मार्केटचे पोलीस निरीक्षक संगमेश शिवयोगी व त्यांच्या सहकाऱयांनी कलईगार गल्ली परिसरातील मटका अड्डय़ावर छापा टाकून शेखर राजू शेट्टी (वय 50, रा. माळी गल्ली), महेश दशरथ कडोलकर (वय 40, रा. ताशिलदार गल्ली), इम्रान हुसेनसाब शेख (वय 30, रा. कलईगार गल्ली) या तिघा जणांना अटक करून त्यांच्या जवळून 4 हजार 700 रुपये रोख रक्कम व मटक्मयाच्या चिठ्ठय़ा जप्त केल्या आहेत.









