प्रतिनिधी/ मौजेदापोली
तालुक्यातील हर्णे बंदरात विनापरवाना गावठी दारू विकणाऱया प्रभा पेडेकर या महिलेविरुद्ध दापोली पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, 12 सप्टेंबर रोजी सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास समुद्रकिनारी उघडय़ावर एक महिला गावठी दारूची विक्री करत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर दापोली पोलिसांनी हर्णे येथे धाव घेतली व शोध सुरू केला असता त्यांना हर्णे-फत्तेगड येथील प्रभा पेडेकर हिच्याकडे बियरच्या बाटल्या व एक गावठी दारूचा कॅन सापडला. पोलिसांनी तिच्याकडून 2 हजार 730 रुपयांचा मुद्देमाल जप्त करत तिच्यावर दापोली महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक निनाद कांबळे, महिला पोलीस हेडकॉन्स्टेबल ढेरे, कॉन्स्टेबल सुशील मोहिते यांनी केली.









