नवी दिल्ली / वृत्तसंस्था
ज्येष्ठ कायदातज्ञ हरिश साळवे वयाच्या 65 वषी दुसऱयांदा लग्न करणार आहेत. बुधवार, 28 ऑक्टोबरला ते लंडनच्या चर्चमध्ये त्यांची मैत्रिण कॅरोलिन ब्रॉसार्डशी विवाहबद्ध होणार आहेत. 56 वषीय कॅरोलिन या व्यवसायाने एक कलाकार आहेत. या दोघांचेही हे दुसरे लग्न आहे. हरिश साळवे यांनीही धर्म परिवर्तन केले असून, त्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला आहे.
साळवे यांचे गेल्या दोन वर्षांपासून कॅरोलिन यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध होते. दोघांमधील समंजसपणाने या मैत्रीचे रुपांतर आता विवाहबंधनात होणार आहे. साळवे यांनी 38 वर्षांच्या वैवाहिक आयुष्यानंतर पहिल्या पत्नीसोबत घटस्फोट घेतला होता. त्यानंतर ते आता दुसरा विवाह करत आहेत. हरिश साळवे यांच्या पहिल्या पत्नीचे नाव मिनाक्षी असून त्यांना दोन मुलीही आहेत. घटस्फोटानंतर साळवे हे मुलांपासून दूर लंडनमध्ये कॅरोलिनसोबत राहत आहेत.









