ऑनलाईन टीम / चंदीगड :
हरियाणामधील सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये लागोपाठ कोरोनाचे रुग्ण आढळून आल्यानेे हरियाण सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार आता हरियाणामधील सर्व शाळा 30 नोव्हेंबर पर्यंत बंद राहणार आहेत.

राज्यात कोरोनाचे वाढते प्रमाण आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्याची सुरक्षा लक्षात घेऊन हरियाणा विद्यालय शिक्षण बोर्डाने सर्व खाजगी आणि सरकारी शाळा दोन आठवड्यांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 30 नोव्हेंबर पर्यंत विद्यार्थ्यांसह शिक्षकांनाही शाळेत येण्यास मनाई केली आहे. तसेच या कालावधीत संपूर्ण शाळेचे सॅनिटायझेशन केले जाणार आहे. या नियमाचे उल्लंघन झाल्यास शाळेचे मुख्याध्यापक जबाबदार असणार आहेत.
दरम्यान, हरियाणामध्ये कोरोनाची दुसरी लाट पहिल्या लाटेपेक्षा अधिक घातक आहे. हिसार आणि रोहतक मंडळातील पाच जिल्ह्यांमध्ये 47 विद्यार्थी आणि 11 शिक्षकांचे कोरोनाचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. तर जिंद जिल्ह्यात गुरुवारी 20 विद्यार्थी आणि 2 शिक्षकांना कोरोनाची लागण झाली आहे.









