ऑनलाईन टीम/तरुण भारत
डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीम सध्या पॅरोलवर फर्लोवर तुरुंगातून बाहेर आला आहे. पॅरोल मिळाल्यानंतर गुरमीत राम रहीमतुरुंगातून बाहेर आला आहे. एडीजीपींनी दिलेल्या रिपोर्टच्या आधारे त्याला तुरुंगातून बाहेर सोडण्यात आलं आहे. आता राम रहिमच्या जीवाला धोका असल्याने हरियाणा सरकारने त्याला झेड प्लस सुरक्षा पुरवली आहे.
दरम्यान, रॅम रहीम बाहेर आल्यांनतर त्याच्या जीवाला खलिस्तान समर्थक कार्यकर्त्यांकडून धोका असल्याने ही सुरक्षा पुरवली असल्याचं सांगण्यात आलं आहे. याबाबत ६ फेब्रुवारीला हायकोर्टात माहिती देण्यात आली होती.
उच्च न्यायालयात सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांमधून असीही माहिती समोर आली होती की डेरा प्रमुख गुरमीत राम रहिमला खलिस्तानी समर्थकांचा धोका आहे. यामुळे हरयाणा सरकारने तुरुंगातून फर्लोवर बाहेर असलेल्या राम रहिमला झेड प्लस सुरक्षा दिली आहे. महाधिवक्त्यांकडून कायदेशीर सल्ला घेतल्यानंतर राम रहिमला झेड प्लस सुरक्षा देण्यासाठी हालचाल सुरु करण्यात आली होती.









