ऑनलाईन टीम / चंदीगड :
हरियाणामध्ये खाजगी लॅबना आता कोरोना टेस्टसाठी मनमानी शुल्क आकारता येणार नाही. याचे कारण म्हणजे सरकारने विशेषज्ञांच्या सल्ल्यानुसार आता पुन्हा एकदा नवीन दर लागू केले आहेत.
याबाबत माहिती देताना आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजीव अरोडा यांनी सांगितले की, आरटी – पीसीआर टेस्टसाठी आता केवळ 900 रुपये आकारले जाणार आहेत. तर रैपिड एंटीजन टेस्ट आता 500 रुपयात होणार आहे.
याआधी आरटी – पीसीआर टेस्टसाठी 1200 रुपये तर एंटीजन टेस्टसाठी 650 रुपये घेतले जात होते. दरम्यान, आता नवीन ठरवण्यात आलेले दर हे लगेचच लागू केले जाणार आहेत. तसेच नवीन दरापेक्षा अधिक दर आकरणाऱ्या खाजगी लॅबवर आरोग्य विभागाकडून कारवाई केली जाणार आहे. आयपीसी कलम 188 अंतर्गत दंड देखील आकाराला जाणार आहे.









