ऑनलाईन टीम / हरियाणा :
हरियाणा राज्यात मागील चोवीस तासात 336 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे हरियाणातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 6 हजार 634 वर पोहोचली आहे. त्यामुळे राज्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कालच्या दिवसात आढळलेल्या 336 रुग्णांपैकी गुरुग्राम मध्ये सर्वाधिक 185, फरिदाबाद मध्ये 57, सोनपतमध्ये 31, झज्जर 3, नुह 5, अंबाला 28, पलवण 28, पानिपत 2, जिंद 1, यमुनानगर 5, फतेहाबाद 2, हिसार 4, चरखीदादरी 1, कैथल 11 आणि कुरुक्षेत्र मधील 3 रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आता पर्यंत हरियाणा राज्यातील एकूण 6634 रुग्णांपैकी 2475 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर आता पर्यंत कोरोनामुळे 70 जणांचा मृत्यू झाला आहे.









