ऑनलाईन टीम / हरियाणा :
हरियाणामध्ये रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हळूहळू वाढत आहे. मागील चोवीस तासात कोरोनाच्या 679 नव्या रुग्णांची नोंद झाली. तर 5 जणांचा मृत्यू झाला. यामध्ये गुरुग्राम, फरिदाबाद, पलवल, सिरसा आणि यमुनानगर मधील प्रत्येकी एक जणांचा समावेश आहे. त्याामुळे कोरोना बाधितांची एकूण संख्या 19 हजार 369 वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत 9502 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत आढळलेल्या रुग्णांमध्ये गुरुग्राममध्ये सर्वाधिक 6467, फरिदाबाद मध्ये 5108, सोनपतमध्ये 1728, रोहतक 875, अंबाला 426, पलवल 410, भिवानी 612, करनाल 458, हिसार 330, महेंद्रगड 337, झज्जर 420, रेवाडी 477, नूंह 276, पानिपत 309, कुरुक्षेत्र मधील 180, फतेहाबाद 134, पंचकुला 131, जींद 142, सिरसामधील 175, यमुनानगर मधील 126, कैथल 124 आणि चरखी दादरीमधील 89 रुग्णांचा समावेश आहे. त्याबरोबरच इटलीतील 14 आणि अमेरिकेतून आलेल्या 21 जणांचा यात समावेश आहे.
तर मृतांची एकूण संख्या 287 वर पोहोचली आहे. तर 71 जणांची प्रकृती गंभीर आहे. तर सध्या रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 74.91 टक्के तर संसर्गाचे प्रमाण 5.76 टक्के इतके आहे.