ऑनलाईन टीम / चंदीगड :
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. त्यातच आता हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांना कोरोनाची बाधा झाली आहे. यासंदर्भात स्वतः मनोहरलाल यांनी ट्विट करत माहिती दिली.

ते आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, सोमवारी सकाळी मी माझी कोरोना टेस्ट करुन घेतली होती. ही टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे गेल्या आठवड्याभरात जे माझे सहकारी आणि अन्य व्यक्ती माझ्या संपर्कात आले होते, त्या सर्वांनी स्वतःची कोरोना चाचणी करून घ्यावी. तसेच माझ्या अत्यंत जवळून संपर्कात आलेल्या लोकांना क्वारंटाइन होण्याचे आवाहन खट्टर यांनी यावेळी केले आहे.
दरम्यान, यापूर्वी कर्नाटकचे मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनाही कोरोनाचा संसर्ग झाला होता.









