लुधियानातील शरीरसौष्टव स्पर्धेत रेणुका मुदलीयार बेस्ट स्पोर्ट्स मॉडेल फिजिक

क्रीडा प्रतिनिधी / बेळगाव
लुधियाना, पंजाब येथे इंडियन बॉडीबिल्डींग फेडरेशन व पंजाब शरीरसौष्टव संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 11 व्या ज्युनियर, मास्टर्स, दिव्यांग शरीरसौष्ठव स्पर्धेत हरियाणाच्या आकाशने सर्वसाधारण विजेतेपद पटकाविले. 170 गुणासह मणिपूरने सांघिक विजेतेपद, तामिळनाडू व उत्तरप्रदेश यांनी 95 गुणासह उपविजेतेपद पटकाविले. महिला फिजिक्समध्ये महाराष्ट्राच्या रेणुका मुदलीयार हिने विजेतेपद पटकाविले. या स्पर्धेत आयबीबीएफ मुंबईच्या नियमानुसार विविध वजनी गटात व मास्टर्स स्पर्धा वयोमर्यादित गटात घेण्यात आली.
निकाल पुढीलप्रमाणे : दिव्यांग विभाग : 65 किलो गट-1) बेनितसिंग -पंजाब, 2) लोकेशकुमार -उत्तराखंड, 3) तामिल शिल्वानन जे -तामिळनाडू 4) सुरेश- तामिळनाडू, 5) मोहिद जावेद -उत्तर प्रदेश. 65 किलोवरील गट -1) हितेश महेश चव्हाण -महाराष्ट्र, 2) जितेंद्र कुमार दिल्ली, 3) जॉयकुमार चौधरी -प. बंगाल, 4) रविंद्रकुमार-दिल्ली, 5) मोहंमद अब्दुल जब्बार -तेलंगना.
मास्टर्स विभाग (40 ते 50 वयोगट): 80 किलोखालील गट -1) प्रदीपकुमार -युपी, 2) मोहंमद आलम-युपी, 3) धनराज अशोक गुलवी-विदर्भ, 4) महंमद असन-युपी, 5) ताराकांत पलीत-प. बंगाल. 80 किलोवरील गट -1) सुभाष शंकर पुजारी-महाराष्ट्र, 2) बाला सुभ्रमण्यम -तामिळनाडू, 3) बैजु आर.-केरळ, 4) जंगबहाद्दूर राणा -एम.पी., 5) सौरव गुहा -प. बंगाल.
मास्टर्स विभाग (50 ते 60 वयोगट) -1) जयरामन षण्मुगम -तामिळनाडू, 2) संजोग रघुवंशी -राजस्थान, 3) सरबजीतसिंग -पंजाब, 4) जयंतकुमार दास -आसाम, 5) रतनकुमार दे.- महाराष्ट्र. मास्टर्स विभाग (60 वर्षावरील गट)- 1) सय्यद हरून शब्बीर हुसे -महाराष्ट्र, 2) रविकुमार -कर्नाटक, 3) तरुणकुमार चटर्जी – ओडिसा, 4) बाबु राजेंद्रन व्ही. -तामिळनाडू, 5) राजेंद्र शिरोडकर -महाराष्ट्र.
ज्युनियर महिला मॉडेल फिजिक -1) अंकिता गन -पं. बंगाल, 2) भाविका प्रधान -सिक्कीम, 3) जेनिका नौरेम -मणिपूर, 4) विद्याराजू दांडेल-विदर्भ, 5) व्ही. एस. लुंजुचॉन -मणिपूर.
महिला स्पोर्ट्स मॉडेल फिजिक -1) रेणुका सी. मुदलीयार -महाराष्ट्र, 2) समृद्धी शही-राजस्थान, 3) केतकी मनोहर पाटील-कर्नाटक (बेळगाव), 4) गुरिया काटुन -आसाम, 5) मोनिका गुप्ता-जम्मू-काश्मिर.
ज्युनियर बॉडिबिल्डिंग (पुरुष)-55 किलो गट-1) फारूक -युपी, 2) आझम थैलबासिंग -मणिपूर, 3) मदन जी. कटगीन्नावर-कर्नाटक (बेळगाव) 4) शाद मिया-उत्तराखंड, 5) रिंकू नायक-ओडिशा. 60 किलो-1) किशन चौधरी झारखंड 2) लीसाराम रोशनसिंग-मणिपूर, 3) अभिजित घोष-झारखंड, 4) कुणाल भारत शेलार-महाराष्ट्र, 5) जगनराज जी.-तामिळनाडू. 65 किलो-1) आकाश- हरियाणा, 2) महंमद शहाबाद शहा-मणिपूर, 3) अब्दुल आदिल-युपी, 4) संजित सिल्वम-पाँडिचेरी, 5) दंडुपरलु राजेश-आंध्रप्रदेश. 70 किलो-1) चिंखइंगानबा अतोकपाम-मणिपूर, 2) किर्तीखयान खन्ना-तामिळनाडू, 3) मयांक चौधरी -युपी, 4) अनरीबान बंडोपाध्ये -पं बंगाल, 5) महंमद झाकीरअली -युपी. 75 किलो- 1) टोनू कुमार-पंजाब, 2) राहुलसिंग चौहान-हरियाणा, 3) सुरजिद दे.-प. बंगाल, 4) कुतुबिम मोहिद असाद -मणिपूर, 5) प्रणव गणेश कोतवाल-महाराष्ट्र. 75 वरील-1) सुरेश बालकुमार -तामिळनाडू, 2) पीबाम मतजीतसिंग -मणिपूर, 3) अंकितकुमार देशमुख-महाराष्ट्र, 4) प्रदीप ठाकुर-एम.पी., 5) विघ्नेश अन्नामलाई- तामिळनाडू.
वैयक्तिक विजेतेपदासाठी फारूक, किशन चौधरी, आकाश, चिंखइंगानबा अतोकपाम, सुरेश बालाकुमार, टोनू कुमार यांच्यात लढत झाली. त्यामध्ये हरियाणाच्या आकाश याने वैयक्तिक मास्टर किताब पटकाविला.
विजेत्या स्पर्धकांना इंडियन बॉडिबिल्डिंग फेडरेशनचे अध्यक्ष अरविंद मधोक, असोसिएट सेपेटरी चेतन पाठारे, जनरल सेपेटरी हिरल शेठ, मि.वर्ल्ड प्रेमचंद डिग्रा, मोहन सबरवाल, नवनीतसिंग विश्वासराव आदी मान्यवरांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना पदके, चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.









