पेडणे (प्रतिनिधी )
पेडणे पोलिसांनी हरमल समुद्र किनाऱयावर धडक मोहिम सुरू करत मंगळवारी सायंकाळी कोम्ब?िग आ?परेशन सुरु केले. पेडणे पोलीस निरीक्षक जीवबा दळवी यांच्या नेतृत्वाखाली हे कोम्ब?िग आ?परेशन सुरु करण्यात आले.
यावेळी उपनिरीक्षक प्रफुल्ल गिरी, उपनिरीक्षक विवेक हळर्णकर आणि पोलीस कर्मचारी यांना बरोबर घेत हे कोम्ब?िग आ?परेशन हरमल समुद्र किनाऱयावर उभारण्यात आलेल्या झोपडय़ा , हा?टेल आणि अन्य आस्थापने तसेच समुद्र किनारी असलेल्या घरात भाडेपट्टीवर देण्यात आले खोल्या या राहणारे सुमारे 50 पेक्षा बिगर गोमंतकीय नागरिकांची झडती घेतली.
यावेळी स्थानिक नागरिक जे व्यवसाय करतात त्यांना कायदेशीर रित्या व्यवसाय करण्याच्या सूचना केल्या. समुद्र किनाऱयावर राहत असलेले बिगर गोमंतकीर नागरिक तसेच विदेशी पर्यटक बेकायदेशीरित्या वावरत असून ते वास्तव्यास असेल तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई कृरण्यात येणार आहे.
यापुढेही पेडणे पोलिसांतर्फे असेच पेडणे तालुक्मयातील सर्व समुद्र किनाऱयावर कोम्ब?िग आ?परेशन करण्यात येईल असे पेडणे पोलीस निरीक्षक जीवबा दळवी यांनी सांगितले .









