प्रतिनिधी / कोल्हापूर
ज्याचा माल त्याचा हमाल या आंदोलनामध्ये कोणावरही अन्याय केला जाणार नाही. राज्यातील सर्व वाहतूकदार संघटना पदाधिकाऱयांची एक संयुक्त बैठक लवकरात लवकर घेऊन त्यावर निर्णय घेण्यात येईल. यातून सर्वांनाच न्याय मिळेल अशी ग्वाही कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले.ज्याचा माल त्याचा हमाल याबाबत माथाडी सल्लागार समिती सदस्यांची बैठक, कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई मंत्रालयात मंगळवारी झाली यावेळी माथाडी कायद्यासंदर्भात विविध विषयावर चर्चा झाली ज्याचा माल त्याचा हमाल यावर सुद्धा चर्चा झाली.
हमाल पंचायतीचे बाबा आढाव म्हणाले, हमालीचे पद्धत पूर्वीप्रमाणेच चालू ठेवावी. आमदार नरेंद्र पाटील म्हणाले मालट्रक वाहतूकदारांचे म्हणणे ऐकून घेण्याची आवश्यकता नाही आमच्या बाजूने एकतर्फी निर्णय घेण्यात यावा अशी त्यांनी मागणी केली.
यावेळी कामगार आयुक्त सुरेश जाधव, जॉईंट कमिशनर माथाडी श्रीमती लोखंडे , कोल्हापूर, सांगली सातारा, सोलापूर, बीड, हिंगोली, पुणे, औरंगाबाद ,नगर, जालना, धुळे, वर्धा, नागपूर येथील माथाडी बोर्डाचे अध्यक्ष, महाराष्ट्र राज्यातील कामगार संघटना प्रतिनिधी, व्यापारी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते अशी माहिती मुंबई व कोल्हापूर जिह्याचे सहाय्यक कामगार आयुक्त संदीप आयरे यांनी दिली आहे. असे पत्रक कोल्हापूर डिस्ट्रिक्ट लॉरी ऑपरेटर्स असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष जाधव यांनी प्रसिध्दीस दिले आहे.









