प्रतिनिधी/ बेळगाव
अयोध्या येथे बुधवार दि. 5 ऑगस्ट रोजी राममंदिर उभारणीसाठी भूमिपूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या सोहळय़ाचे औचित्य साधून हमारा देश संघटनेच्यावतीने टिळकवाडी व अनगोळ परिसरात बॅनर लावून जनजागृती केली आहे.
बुधवारी सकाळी 9 वाजता स्वामी विवेकानंद कॉलनी गणेश मंदिरमध्ये महाआरती व प्रसादाचे आयोजन करण्यात येणार आहे. सामाजिक अंतर व मास्कचा वापर करून या महाआरतीमध्ये भक्तांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन संघटनेच्यावतीने करण्यात आला आहे.
टिळकवाडी, पहिले रेल्वेगेट, आरपीडी कॉर्नर, अनगोळ क्रॉस येथे बॅनर लावण्यात आले आहेत. याबाबत मंगळवारी जनजागृती करण्यात आली. या कार्यक्रमामध्ये वेंकटेश शिंदे, संदीप भिडे, अजित पाटील, मल्लिकार्जुन कोंकणी, कोटगी, विजयकुमार, राजाराम कुडतुरकर, मुकेश वेर्णेकर, भालचंद्र जाधव यांनी सहभाग घेतला होता.









