बेळगाव / क्रीडा प्रतिनिधी
एमसीसीसी स्पोर्ट्स क्लब आयोजित हनुमान चषक 14 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेला बुधवार दि. 31 मार्चपासून युनियन जिमखाना मैदानावर प्रारंभ होत आहे.
ही स्पर्धा 14 वर्षाखालील खेळाडूंसाठी आयोजित करण्यात आली आहे. इच्छुक संघांनी आपली नावे सोमवार दि. 29 मार्च रोजी सायं. 5 पर्यंत युनियन जिमखाना कार्यालयात आपली नावे नोंदवावीत. या स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या संघाला आकर्षक चषक व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे उत्कृष्ट फलंदाजी उत्कृष्ट फलंदाज, मालिकावीर व प्रत्येक सामन्यातील सामनावीराला पुरस्कार देण्यात येणार आहे.









