विलासपूर परिसराच्या विकासासाठी निधी, साविआने शब्द पाळला-उदयनराजे
प्रतिनिधी/ सातारा
सातारा शहराच्या दक्षिणेकडील विलासपूर आणि परिसरातील आम्ही सुचवलेली 4 कोटी 50 लाख रुपयांची विविध विकासकामांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या सूचनानुसार शासनाच्या वैशिष्टय़पूर्ण योजनेमधुन प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. याबाबतचा शासननिर्णय कालच निर्गमित झाला. या विकासकामांमुळे या भागाला अनेक सुविधा उपलब्ध होणार आहेतच. तथापि विलासपूर भागाकरीता सातारा विकास आघाडीने दिलेला शब्द पाळला आहे अशी आश्वासक माहिती खासदार उदयनराजे भोसले यांनी दिली आहे.
उदयनराजे यांनी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात पुढे नमुद केले आहे की, विलासपूर आणि परिसराच्या विकासाकरीता येथील युवा नेता संग्राम बर्गे यांनी सूचविलेल्या विकासकामांबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आग्रही शिफारस केली होती. त्या कामांना वैशिष्टय़पूर्ण योजनेमधुन 4 कोटी 50 लाख रुपयांचा आवश्यक तो भरीव निधी मंजूर केला आहे. विलासपूर येथील फॉरेस्ट कॉलनी/गणेश नगरलगत, ओढय़ाला कॅनॉल टाईप ड्रेनेज व बाजुला वॉकिंग ट्रक करणे व सुशोभिकरण करणे- रुपये 1 कोटी 35 लाख. गोळीबार मैदान येथील साई कॉलनी ते पालवी चौक रस्त्यास दोन्ही बाजुस ड्रेनेज व रस्ता करणे रु.1 कोटी 10 लाख. काळंबीचा ओढा गोळीबार मैदान येथे साकव पूल बांधणे, रुपये 30 लाख. साई कॉलनी येथील ओपन स्पेसमध्ये वॉकिंग ट्रक व ओपन जीम करणे- 30 लाख. सुतार कॉलनी येथील मोकळया जागेत सभा मंडप बांधणे- रुपये 30 लाख. नंदादीप सह.गृहनिर्माण संस्था गोळीबार मैदान, येथील सर्वे नं.88/2अ मधील कांबळे घर ते मुख्य रस्त्यापर्यंत अंतर्गंत 130 मीटर कॉक्रीटीकरण करणे रुपये- 10 लाख. अवि कॉलनी येथील श्री. झगदाळे सर यांच्या घरापासून ते श्री. गोरेसाहेब यांच्या घरापर्यंत 100 मीटर रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे रुपये 10 लाख. बापुजी साळुंखे नगर व शिवशक्ती नगर येथे डांबरीकरण व लादीकरण करणे-10 लाख. गणेशनगर येथे गणेशनगर ते फॉरेस्ट कॉलनी यांना जोडणारा मधला रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे 10 लाख. कारंजकरनगर येथील श्री.काकडे यांच्या घरापासून ते श्री. कळसकर यांच्या घरापर्यंत रस्ता डांबरीकरण करणे रुपये 10 लाख. कोयना सन्मित्र हौसिंग सोसा. येथील अंतर्गंत रस्ते खडीकरण व डांबरीकरण करणे रुपये 15 लाख. सहजीवन सोसा.येथील मोकळया जागेत ओपन स्पेस व बाग बगिचा विकसित करणे रुपये 30 लाख. राधिकानगर येथे बंदिस्त गटर बांधकाम करणे रुपये 10 लाख. पायरी पार्क गोळीबार मैदान येथील ओपन स्पेस विकसित करणे रुपये 20 लाख.
या हद्दवाढ झालेल्या विलासपूर आणि परिसरातील 14 कामांचा समावेश आहे. या मंजूर विकास कामांमुळे या भागाचा परिपूर्ण विकास होण्याबरोबरच परिसराचा कायापालट होणार आहे.








