जलपाईगुडी / वृत्तसंस्था
दोन जंगली हत्तींनी शहरात प्रवेश करत उच्छाद मांडल्याने उत्तर बंगालमधील या शहरात रविवारी प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आला आहे. मध्यरात्री अडीच वाजता शहरानजीकच्या वनविभागातून हे हत्ती शहरात शिरले. शहर आणि वन यांच्या विभागणारी भिंत पाडून त्यांनी शहरात प्रवेश केला. त्यानंतर प्रशासनाने शहरात जमावबंदी घोषित केली. हत्तींच्या जवळ लोकांनी जाऊ नये तसेच हत्तींना सतावू नये म्हणून जमावबंदी आदेश काढल्याचे स्पष्ट करण्यात आले. हत्तींनी काही घरांची हानी केली. वनविभागाचे अधिकारी त्यांच्यावर लक्ष ठेवून होते. सूर्य उगविल्यानंतर हे हत्ती परत वनात गेले असे स्पष्टीकरण देण्यात आले.









