प्रतिनिधी /म्हापसा
हडफडे नागवा पंचायतीच्या सरपंचपदी श्रीकृष्ण नागवेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. करारानुसार राजेश मोरजकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यावर हे पद रिक्त झाले होते. त्यानुसार या पदी नागवेकर यांची नियुक्ती करण्यात आली.
राजेश मोरजकर यांनी नाव सुचविले तर व्हिवोलेंटा डिसोझा यांनी त्यास अनुमोदन दिले. यावेळी पंच दिपीका रेडकर, विद्याधर दिवकर, सखाराम नाईक उपस्थित होते. पंच सलीन सय्यद अनुपस्थित होते. हडफडे गावात जी कामे बाकी आहेत ती स्थानिक मंत्री मायकल लोबो यांच्या नेतृत्वाखाली पूर्णत्वाकडे नेऊ असे ते म्हणाले. मावळते सरपंच राजेश मोरजकर यांनी अभिनंदन केले.









