सातारा/प्रतिनिधी
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे हडपसर, पुणे येथून आलेल्या 27 वर्षीय पुरुषचा मृत्युनंतर घेण्यात आलेला नमुना निगेटिव्ह आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.
237 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह
एन.सी.सी.एस. पुणे यांच्याकडून 125, कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड यांच्याकडून 13 जणांचे, क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे तपासणी करण्यात आलेल्या 23 जणांचे त्याचबरोबर खासगी प्रयोगशाळेत तपासणी करण्यात आलेल्या 76 असे एकूण 237 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचेही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गडीकर यांनी कळविले आहे.
तसेच काल कळविण्यात आलेल्या 55 वर्षीय पुरुषाचे गाव नवसारी ता. पाटण नसून मुळगाव पाल. ता. कराड असे आहे, अशीही माहिती डॉ. गडीकर यांनी दिली आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








