ऑनलाईन टीम / रियाध :
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सौदी अरेबिया सरकारने परदेशी भाविकांना हज यात्रेसाठी बंदी घातली आहे. सौदी अरेबियातील एक हजार भाविकांनाच या यात्रेसाठी परवानगी देण्यात आली असून, त्यासाठी काही नियम घालून देण्यात आले आहेत.
हज यात्रेदरम्यान भाविक सैतानाला रस्त्यावरील दगड मारतात. मात्र, यंदा सॅनिटायझरने स्वच्छ केलेले दगड या ठिकाणी ठेवण्यात येणार आहेत. भाविकांनी तेच दगड सैतानाला मारायचे आहेत. नमाज पठणासाठी स्वतंत्र चादर आणावी लागेल. तसेच भाविक झमझम विहीरीतील पाणी पिणार नाहीत. प्लॅस्टिक बाटल्यांमध्ये भाविकांना पाणी देण्यात देईल.
सर्व भाविकांना मास्क आणि सोशल डिस्टन्स पाळणे आवश्यक असेल. तसेच यात्रेसाठी नोंदणी केलेल्या सर्वांची कोरोना टेस्ट करणे बंधनकारक असेल. जुलै अखेरीस या यात्रेला सुरुवात होणार आहे.