बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव-धारवाड व्हाया कित्तूर या रेल्वेमार्गाकरिता प्रयत्न केले जात होते. परंतु या प्रयत्नांना आता ब्रेक लागण्याची शक्मयता आहे. कारण नुकत्याच झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये या मार्गाचा पिंक बुकमध्ये समावेश झाला असला तरी या प्रकल्पासाठी अनामत रक्कम म्हणून केवळ 1 हजार रुपये मंजूर करण्यात आल्याने सध्या तरी हा प्रकल्प होणे अशक्मय दिसत आहे.
रेल्वे मंत्रालयाकडून लागू करण्यात येणाऱया नवीन प्रकल्पांचा समावेश पिंक बुकमध्ये करण्यात येत असतो. या पिंक बुकमध्ये बेळगाव-धारवाड या मार्गाचा समावेश करण्यात आल्यामुळे हा प्रकल्प होणार यात शंका नसली तरी तो नेमका केव्हा पूर्ण होणार याबाबतची शाश्वती नाही. हा मार्ग झाल्यास बेळगाव ते धारवाडमधील अंतर कमी होणार आहे. त्यामुळे रेल्वेचा प्रवास सुसाट होण्याची शक्मयता आहे.
हा प्रकल्प होण्याकरिता स्वत: केंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्यांनी लक्ष घातले होते. परंतु अर्थसंकल्पामध्ये या मार्गासाठी निधीची तरतूद करण्यात आलेली नसल्याने या मार्गासाठी आता विलंब होणार आहे. या प्रकल्पासाठी फक्त 1 हजार रुपयांचे टोकन मंजूर करण्यात आल्यामुळे बेळगावकर नागरिकांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम रेल्वे विभागाने केल्याची चर्चा रंगू लागली आहे.









