ऊस उत्पादनात होणार घट , शेतक-यांना बसणार आर्थिक फटका
प्रतिनिधी / व्हनाळी
एका बाजूला ऊस तोडणी सुरू झाली असली तरी दुस-या बाजूला कांही ठिकाणी मोठ्या प्रमाणात उसाला तुरे येत असल्याचे दिसत आहे. कोरोनाच्या महामारीमुळे आदीच अडचणीत असणारा शेतकरी परतीचा पावसाने झालेले नुकसान आणि त्यातच आता ऊसाला फुटलेल्या तु-यामुळे अणखीनच अडचणीत येण्याची शक्यता वाटत आहे. आवकाळी पावसाने कांही ठिकाणी ऊस पिक भुईसपाट झाले आहे. या पडलेल्य़ा ऊसाला देखील फुटवे फुटले आहेत. या सर्वांमुळे ऊसाच्या वजनात होणारी घट अटळ असल्याने कागल तालुक्यातील शेतक-यांनी सिमा भागातील कारखान्यांना लवकर ऊस जाण्यासाठी स्वतःहुण पसंती दर्शविली आहे.
कारखान्याच्या गळीत हंगामाला सुरूवात झाली आहे. परंतू यावर्षीचा हंगाम शेतक-यांसमोर अनेक संकटे घेवून आला आहे. अवकाळी पावसाने भात,सोयाबीन पिकाला फटका दिलाच परंतू आता ऊस शेतीची आवस्ता देखील बिकट झाली आहे. गळीत हंगामाच्या सुरूवातीलाच ऊसाला तुरे फुटले आहेत. वातावरण बदलाचा आणखी एक परिणाम म्हणजे, पाऊस काळात आलेल्या वादळी वा-यामुळे पडलेल्या ऊसाला फुटवे आले आहेत. त्यामुळे शेतक-यांसमोर क्रमपाळीची वाट बघण्यापेक्षा तातडीने ऊस कारखान्यांना पाठवणे यवढाच पर्याय आता शिलल्लक राहिला आहे. नुकसान अटळ आहे परंतू ते कमी करण्याचा प्रयत्न करताना शेतकरी ऊस सिमा भागातील कारखान्यांना स्वताहून पाठवत आहेत.
गेल्या अनेक वर्षांच्या तुलनेत यंदा सरासरी पावसाने जोरदार हजेरी लावली तसेच पावसाळ्यात जोरदार पाऊस पडल्यानंतर परतीच्या पावसाचा मुक्कामही खूप दिवस राहिला. त्याची खबरदारी घेत शासनाने यावेळी गळीत हंगाम वेळेत सुरू केला असला तरी गळितासाठी यंदा जाणार्या उसाला कमी कालावधीतच तुरे फुटले आहेत. विशेषत: आडसाली उसाला तुरे फुटलेले आहेत. त्याचबरोबर खोडव्याच्या उसालाही तुरा फुटू लागला आहे. यापूर्वी काही ठरावीक जातीच्या उसाला तुरा फुटत होता. तुरा फुटल्याने वजनात होणारी घट व उसाच्या वाड्याचा वैरणीसाठी वापर होत नाही. त्यामुळे शेतकर्यांच्या उसाच्या उत्पादनात घट होतेच, त्याचबरोबर जनावरांच्या वैरणीचा प्रश्नही निमार्ण होतो.
उसाच्या काही वाणांना ठरावीक दिवसानंतर तुरा फुटत असल्याने शेतकर्यांनी उसाचे नवीन वाण वापरण्यास सुरुवात केली होती. पाण्याचे जास्त प्रमाण असणार्या शेतात तुर्याचे प्रमाण जास्त येत होते. मात्र यावर्षी अतिपावसाने पाण्याचे प्रमाण जास्त झाल्याने सर्व जातीच्या उसाला तुरे फुटण्यास सुरूवात झाली आहे. तुरे फुटलेल्या ऊसाची साखर कारखान्यांनी वेळेत उचल करावी अन्यथा शेतक-यांचे नुकसान अटळ आहे. सरकारी पातळीवरून आशा पद्धतीचे आदेश देण्यात यावेत अशी मागणी तुरे फुटलेल्या ऊसउत्पादक शेतक-यांतून होत आहे.
अवेळी केलेली अडसारी ऊस लागण, पावसाचे अधिक प्रमाण तसेच ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यातील दिवस रात्रीचे तापमान, आद्रता नायट्रोजन चे कमी प्रमाण यामुळे ऊसाच्या विविध जातींना नोव्हेंबर महिन्यात तुरे फुटतात. तुरे फुटलेल्या ऊसाचे दोन ते अडीच महिने वजन घटत नाही.
आबासाहेब साळोखे ऊस तंज्ञ, माजी शास्त्रज्ञ वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, पुणे.
तुरे फुटलेल्या व पावसामुळे कोलमडून पडलेल्या ऊसाची संबंधित परीसरातील साखर कारखान्यानी लवकर तोडणी करून ऊसाची उचल वेळेत करून शेतक-यांना दिलासा द्यावा. अशोक पांडूरंग पाटील साके, शेतकरी









