वृत्तसंस्था/ जिनिव्हा
स्वीसची महिला टेनिसपटू 32 वर्षीय टिमा बॅक्सिन्झ्कीने शुक्रवारी आंतरराष्ट्रीय टेनिस क्षेत्रातून आपल्या निवृत्तीची घोषणा केली. 2016 रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत बॅक्सिन्झ्कीने मार्टिना हिंगीससमवेत महिला दुहेरीत रौप्यपदक मिळविले होते.
2019 च्या सप्टेंबरनंतर बॅक्सिन्झ्कीने टेनिसपासून अलिप्त होती. पाठदुखापतीमुळे तिला वारंवार वेदना जाणवत होत्या. कोरेना महामारीच्या पार्श्वभूमीवर तिने आंतरराष्ट्रीय व्यावसायिक टेनिस क्षेत्रातून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला. 2015 व 2017 साली तिने प्रेंच ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेत उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती.








