वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
स्वीसची डावखुरी महिला टेनिसपटू जिल टीचमनने शनिवारी येथे डब्ल्यूटीए टूरवरील लेक्झ्ंिाग्टन खुल्या आंतरराष्ट्रीय महिलांच्या टेनिस स्पर्धेत एकेरीची अंतिम फेरी गाठताना अमेरिकेच्या रॉजर्सचा पराभव केला. टीचमन आणि अमेरिकेची ब्रॅडी यांच्यात जेतेपदासाठी लढत होईल.
स्वीसच्या टीचमनने यापूर्वी डब्ल्यूटीए टूरवरील दोन स्पर्धा जिंकल्या असून आता ती तिसरी स्पर्धा जिंकण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे. शनिवारी झालेल्या उपांत्य सामन्यात टीचमनने रॉजर्सचा 6-3, 6-2 असा पराभव केला. अमेरिकेच्या जेनीफर ब्रॅडीने आपल्याच देशाच्या 16 वर्षीय कोको गॉफवर 6-2, 6-4 अशी मात करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. महिला टेनिसपटूंच्या मानांकन यादीत टीचमन 63 व्या स्थानावर आहे.









