साहित्य : 1 वाटी स्वीटकॉर्न, 2 चमचे बटर, 1 वाटी तयार भात, अर्धी वाटी शेवया, अर्धी वाटी व्हाईटसॉस, अर्धा चमचा काळीमिरीपूड, अर्धा चमचा ओवा, अर्धा चमचा मीठ, चिमुटभर जायफळ पावडर, 1 चमचा बेडक्रम्स, 3 चमचे कोथिंबीर चिरून, 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून, तेल तळण्यासाठी
कृती : स्वीटकॉर्न वाफवून घ्यावेत. गरम असतानाच मिक्सरला लावून बारीक करून घ्यावेत. नंतर गरम बटरमध्ये दोन मिनिटे परतवून आच बंद करावी. आता त्यात भात, व्हाईटसॉस, बेडक्रम्स, ओवा, हिरवी मिरची, कोथिंबीर, जायफळ पावडर, काळीमिरी पावडर आणि मीठ घालून मिश्रण चांगले एकजीव करून घ्यावे. एका ताटात शेवया हातानेच कुस्करून घ्याव्यात. हाताला तेल लावून स्वीटकॉर्नच्या मिश्रणाचे मध्यम आकाराचे उभट गोलाकार गोळे बनवावेत. नंतर शेवयांमध्ये हलक्या हाताने घोळवावेत. कढईत मध्यम आचेवर तेल गरम करावे. तेल चांगले गरम झाले की आच मंद करून त्यात तयार रोल सोडून हलक्या सोनेरी रंगावर तळावेत. तयार क्रॉकेट्स चटणी अथवा सॉससोबत खाण्यास द्या.









