दोन दिवसात निवडीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता
प्रतिनिधी/ सातारा
सातारा पालिकेत भाजपच्या स्वीकृत नगरसेवक विकास गोसावी यांनी आपल्या पदाचा राजीनामा वरिष्ठांच्या आदेशानुसार देण्यात आला आहे.त्यानुसार मुदत संपल्याने नव्याने निवडीचा कार्यक्रम लागण्याच्या शक्यता आहे.स्वीकृत नगरसेवक पदासाठी तब्बल 15 जण रेसमध्ये आहेत. कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब होणार याकडे लक्ष लागून राहिले आहे.
सातारा नगरपालिकेत भाजपच्या कोटय़ात एक स्वीकृत नगरसेवक पद वाटय़ाला आहे.स्वीकृत नगरसेवक विकास गोसावी यांची मुदत संपल्याने वरिष्ठांनी दिलेल्या आदेशानुसार त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दि.14 जुलैला देण्यात आला.रिक्त झालेल्या स्वीकृत नगरसेवक पदासाठी निवडणूक कार्यक्रम लागण्याची शक्यता जर भाजपकडून एकच उमेदवार दिला तर बिनविरोध निवड होईल.पण अर्ज आल्यास निवड ऑन लाईन घेण्याची तयारी प्रशासनाने केली आहे.इच्छुकांमध्ये 15 जणांची नावे आहेत.विक्रम बोराटे,विठ्ठल बलशेठवार, जयदीप ठुसे,विक्रांत भोसले, शैलेंद्र कांबळे,विजय पांडे, सुनेशा शहा, महेंद्र कदम असे पंधरा जण असून त्यात कोणाचे वजन कार्यकारिणीत पडते.त्यावर त्याला संधी मिळणार आहे. निवडणूक कार्यक्रम काढण्याच्या हालचाली सुरू आहेत.








